ताडपत्री न बांधता कोळशाची ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:23 PM2019-06-17T23:23:26+5:302019-06-17T23:23:42+5:30
वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळ्शाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळशावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घूस : वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळ्शाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळशावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.
ओव्हरलोड व ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ओव्हरलोड वाहतूक करण्याबरोबरच ट्रकवर ताडपत्री बांधणे बंधनकारक आहे. मात्र घुग्घुस परिसरातील ट्रक मालक, चालकाकडून नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे ट्रकमधील कोळसा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडतो. त्यादरम्यान रस्त्यावरुन जाणाºया वाहन चालकाच्या अंगावर हा कोळसा पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या परिसरात काही ट्रकच्या मागेपुढे ट्रक क्रमांक नाही. सदर ट्रक हा मुंगोलीकडून एसीसीमार्गे घुग्घुस पोलीस ठाण्याच्या मार्गाने जात असतो. नियमाची पायमल्ली करणाºया ट्रकमालक व चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्याच्या समस्या
कोळशाची धूळ उडत असल्याने ती श्वसनाद्धारे आतमध्ये जाते. त्यामुळे नागरिकांना दमा, आतड्याचे विकार, श्वसनाचे विकार अशा अनेक आजार जळत आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. यासोबतच कोळसा वाहतूक होत असलेल्या ट्रकच्या मागे असणाºया दुचाकीवाहनाच धुळीमुळे अपघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने विना ताडपत्रीद्वारे जाणाºया ट्रकवर कारवाई करावी.