तलावाच्या मालकीहक्कावरून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:52+5:30

पाहार्णी येथे तलावाच्या मालकीहक्कावरून दोन गटात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडेही हा वाद यापूर्वीच गेला आहे. हा वाद लक्षात घेऊन येथील तहसिलदारांनी दोन्ही गटांना सीमांकन होईपर्यंत तलावावर जाण्यास मनाई केली आहे. सोमवारी तलावाचे सीमांकनही करण्यात येणार होते, अशी माहिती आहे.

Ownership of the lake in two groups | तलावाच्या मालकीहक्कावरून दोन गटात हाणामारी

तलावाच्या मालकीहक्कावरून दोन गटात हाणामारी

Next
ठळक मुद्देदोन्ही गटाचे १४ लोक जखमी । दोन्ही गटाच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तलावाच्या मालकी हक्कावरून पाहार्णी येथे दोन गटात चांगलीच हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटाचे १४ लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पाहार्णी येथे तलावाच्या मालकीहक्कावरून दोन गटात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडेही हा वाद यापूर्वीच गेला आहे. हा वाद लक्षात घेऊन येथील तहसिलदारांनी दोन्ही गटांना सीमांकन होईपर्यंत तलावावर जाण्यास मनाई केली आहे. सोमवारी तलावाचे सीमांकनही करण्यात येणार होते, अशी माहिती आहे. मात्र तहसिलदारांचा हा आदेश धुडकावून शनिवारी एक गट सिंगाडे काढण्यासाठी तर दुसरा गट मच्छीमारीसाठी तलावावार गेला. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. या वादात व हाणामारीत दोन्ही गटाचे १४ लोक जखमी झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
या हाणामारीत विलास मारबते, दिलीप मारबते, ललिता मारबते, तुळशीराम मारबते, कैलास शिऊरकर, विजय मारबते, दिलीप वलथरे, मुखरू इरपाते, शास्त्री वलथरे, विकास नान्हे, गोपाल नान्हे, सुधाकर नान्हे, दिवाकर नान्हे, नारायण नान्हे, भगवान नान्हे हे जखमी झाले आहेत. या सर्वांवर नागभीड ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. विलास मारबते यांची प्रकृती गंभीर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. वृत्त लिहित असताना गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पाहार्णी येथील दोन्ही गटांचे शेकडो नागरिक रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यासमोर होते.

Web Title: Ownership of the lake in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.