विरूर स्टेशन येथे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:48+5:302021-05-10T04:27:48+5:30

राजुरा : आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील आशाधाम रुग्णालयास भेट देऊन येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा ...

Oxygen bed facility should be provided at Virur station | विरूर स्टेशन येथे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करावी

विरूर स्टेशन येथे ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करावी

Next

राजुरा : आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील आशाधाम रुग्णालयास भेट देऊन येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. येथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था करून स्थानिक परिसरातील गोरगरीब कोरोना रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, आजच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आशाधामसारखे रुग्णालय मदत करण्यास तयार आहे. येथील एकूण परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीष गाडे, सरपंच भाग्यश्री आत्राम, अजय रेड्डी, बोंडे गुरुजी, सोनू सिंग, इरफान सय्यद, राकेश रामटेके, मंगेश पावडे, ज्ञानेश्वर गोरे, प्रवीण चिडे, विलास आक्केवार, पवार गुरुजी, नामदेव चिडे, अजित सिंग, बाबुराव फटाले, कवडू दोरखंडे, संगेश पावडे, मोतीराम डोब्बलवार यासह आशाधाम रुग्णालयाचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Oxygen bed facility should be provided at Virur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.