पं. स. पोटनिवडणूक; अपक्ष उमेदवाराची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:07 PM2018-04-07T23:07:17+5:302018-04-07T23:07:17+5:30

P. S. Byelection; Independent candidate's bet | पं. स. पोटनिवडणूक; अपक्ष उमेदवाराची बाजी

पं. स. पोटनिवडणूक; अपक्ष उमेदवाराची बाजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : पंचायत समितीच्या घुग्घुस गणातील रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार आगदारी यांनी काँग्रेस व भाजप उमेदवाराचा पराभव करीत विजयश्री मिळविली.
अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार आगदारी यांना २५५४, काँग्रेस उमेदवाराला १९०६ तर भाजप उमेदवाराला १८१७ मते मिळाली. या निवडणुकीत ९२ मतदारांनी नोटाच्या बटनचा उपयोग करून सर्वच उमेदवारांना नाकारले. भाजपच्या पं.स.सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येमुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे शुक्रवारी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजपला आपली जागा राखता आली नाही. भाजप उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे काँग्रेसला नेहमीप्रमाणे गटबाजीचा फटका बसला.
काँग्रेसला घरचा अहेर
काँग्रेसने ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या भारिपच्या आशा अनिरुद्ध आवळे यांना उमेदवारी दिली होती. पार्सल उमेदवाराला पक्षाची तिकीट दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत असंतोष पसरला होता. त्यामुळे काँग्रेच्या असंतुष्ट नेत्यांनी व इतर पक्षांनी रजिंता पवनकुमार आगदारी यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. यात त्यांचा विजय झाला. काँग्रेस उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने तोंडचा घास हिरावला गेला.

Web Title: P. S. Byelection; Independent candidate's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.