धान रोवणीच्या कामांना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:48 PM2019-07-29T22:48:56+5:302019-07-29T22:49:09+5:30
जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.
भरपूर पावसाचे समजले जाणारे आद्रा व पुनर्वसन हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने धान पऱ्हे करपण्यास सुरुवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात पाऊस बरसला. रविवारी आणि सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदींच्या जलसाध्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतिक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा- अर्जा करुन वरुण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात आले. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर चार दिवसांपासून पाऊस सुरु झाला. दमदार व संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले. त्याचे पऱ्हे सुद्धा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, सावली, मूल आदी तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे. मागील काही वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे काही शेतकरी बाहेरगावावरुन मजूर आणत असून रोवणीची कामे करून घेत आहेत. ज्या गावात बहुतांश जणांकडे शेतजमीन आहे. असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजूरांचा आधार घेतला जात आहे. एकूणच सर्वत्र धानपिक रोवणीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, कोरपना, राजुरा,जिवती, वरोरा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी असून या शेतकºयांनाही पावसासामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.