पाचगाव ग्रामसभा म्हणते, वाघाच्या शिकार प्रकरणात आरोपींचा ग्रामसभेशी संबंध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:15+5:302021-09-25T04:30:15+5:30
काही इसम वाघाच्या अवयवांची तस्करी करीत असल्याची माहिती बुटीबोरी वन पथकाला लागली. सापळा रचून अवयवांसह महादेव टेकाम (रा. पाचगाव, ...
काही इसम वाघाच्या अवयवांची तस्करी करीत असल्याची माहिती बुटीबोरी वन पथकाला लागली. सापळा रचून अवयवांसह महादेव टेकाम (रा. पाचगाव, ता. गोंडपिपरी) याला रंगेहात अटक केली होती. अधिक चौकशीत वन पथकाने पाचगावातील विजय आलाम, रामचंद्र आलाम, वसंता टेकाम व सुधाकर ढवस यांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य, वन्यजीवांचे अवयव जप्त केले. कोठारी वनक्षेत्रात पाचगाव ग्रामसभा असून जंगलाचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामसभेची आहे. त्यावर सदस्यांची उपजीविका आहे. वाघ शिकार प्रकरणात अडकलेल्या आरोपींवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी, पुढे असला प्रकार कुणीही करणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामसभेने घेतली आहे. शिकार प्रकरणात अडकलेले आरोपी आता ग्रामसभेचे सदस्य नाहीत. त्यांचा ग्रामसभा पाचगावच्या सामूहिक वनक्षेत्रात दोन ते तीन वर्षांपासून संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनामध्ये सहभाग नाही. त्यांचा वनहक्क ग्राम समितीशी वा ग्रामसभेशी काहीही संबंध नाही. ग्रामसभा बेकायदेशीर कृत्यांना सहकार्य करीत नाही. जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे पाचगाव ग्रामसभेचे ठाम मत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.