पॅकेज टूर्समधून एस.टी.ने करता येणार पर्यटनवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:23+5:302021-02-12T04:26:23+5:30

चंद्रपूर-हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प-भामरागड त्रिवेणी संगम-चंद्रपूर अशी बस चालविण्यात येणार आहे. ही बस शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटकांना ...

From package tours, tourism can be done by ST | पॅकेज टूर्समधून एस.टी.ने करता येणार पर्यटनवारी

पॅकेज टूर्समधून एस.टी.ने करता येणार पर्यटनवारी

Next

चंद्रपूर-हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प-भामरागड त्रिवेणी संगम-चंद्रपूर अशी बस चालविण्यात येणार आहे. ही बस शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटकांना घेऊन सकाळी ८.३० वाजता निघणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६.५० वाजता परत येणार आहे. या बसला एका पर्यटकाला तिकिटापोटी ४६५ रुपये, १२ वर्षांखालील मुलाला २३० रुपये प्रवास भाडे आकरण्यात येणार आहे. बस आरक्षित करण्यासाठी सीएचएन- बीएमआरजीडी-वाया बल्लारपूर या सांकेतिक कोडच्या आधारे आरक्षण करता येणार आहे.

तसेच मार्कंडा देव, झोपला मारोती देवस्थान, बटरफ्लाॅय गार्डन, आगरझरी येथे जाणेही आता अगदी सोपे होणार आहे. येथे जाण्यासाठी शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी सकाळी आठ वाजता पर्यटकांना घेऊन बस निघणार असून सायंकाळी सहा वाजता परत येणार आहे. यासाठी प्रौढांसाठी २३०, तर १२ वर्षांखालील मुलांसाठी ११५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे. या बसचे पर्यटकांना सीएचएन-एमआरकेओ-वाया मूल या सांकेतिक कोडवरून आरक्षण करावे लागणार आहे. दरम्यान, एखाद्या पर्यटनस्थळ, धार्मिक स्थळ, ऐतिहासिक वास्तुदर्शनासाठी ग्रुप बुकिंगसाठी बस पाहिजे असल्यास चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा येथूनही बस मिळणार आहेत. पर्यटन स्थळावरील प्रवेश शुल्क प्रवाशांना द्यावे लागणार आहे.

Web Title: From package tours, tourism can be done by ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.