सिंचनाअभावी धान पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:15 AM2018-11-16T00:15:14+5:302018-11-16T00:15:42+5:30

मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, ........

Paddy crops due to irrigation are not affected | सिंचनाअभावी धान पिके करपली

सिंचनाअभावी धान पिके करपली

Next
ठळक मुद्देसर्वेक्षणाची मागणी : आलेवाही, नवेगाव शिवारातील पिके प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची अडवणूक होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.
मूल तालुक्यातील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्ची घालूनही हजार रूपयाचेही उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगाव व गांगलवाडी या शिवारातील नुकसानीचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे.
याच शिवारातील काही शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्चही व्यर्थ गेला आहे.
पाणी वितरण समितीचे दुर्लक्ष
यंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतु ही समिती शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न राहता स्वत: उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगाव शिवारातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

Web Title: Paddy crops due to irrigation are not affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.