धान उत्पादकांना पुन्हा पावसाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:06+5:302021-08-22T04:31:06+5:30
नागभीड : गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेने आभाळाकडे डोळे लावून आहेत. यावर्षी हंगामाच्या ...
नागभीड : गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेने आभाळाकडे डोळे लावून आहेत. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून पीक योग्य पाऊस पडत आहे. आवते, पऱ्हे आणि रोवणी वेळेवर झाली. मात्र, पाच-सहा दिवसांपासून पाऊस गायब आहे.
मातीच्या ढिगाऱ्यावर झुडपे वाढली
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या ढिगाऱ्यावर झुडपी जंगल निर्माण झाले असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.
बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे. तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागतात. मात्र बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचा पर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. बल्लारपूर-सिंरोचा रेल्वे मार्ग तयार झाल्यास नागरिकांना सोईचे होणार आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग करण्याची मागणी आहे.
शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे
चंद्रपूर : सरकी ढेपीचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळ्या आदी जनावरे पाळत आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय डबघाईस येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. मात्र बहुतांश रस्त्यावर खड्डे असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाहनधारकांवर कारवाई करावी
चंद्रपूर : शहरातील अनेक वाहनधारक नियमानुसार नंबर प्लेटवर नंबर न टाकता विविध कलर आणि डिझाईन मध्ये नंबर टाकतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढली
चंद्रपूर : कोरोनाचे संकट आता काही प्रमाणात कमी झाले आहे. रुग्णसंख्याही घटत आहे. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पहाटेच्या वेळी रस्त्याने मोठ्या संख्येने नागरिक फिरताना दिसत आहे.
बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे. तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागतात. मात्र बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.