कृषी विभागातर्फे शेतकºयांच्या बांधावर धान रोवणीचे प्रात्याक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:30 AM2017-09-07T00:30:11+5:302017-09-07T00:30:25+5:30

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती व समृध्द शेतकरी’ अभियानाअंतर्गत सिंदेवाही मंडळ क्षेत्रात ९ गावांची निवड करण्यात आली. या अभियानातंर्गत प्रात्याक्षिकासाठी २५ शेतकºयांची निवड करण्यात आली.

Paddy Rovani Pratikshakkha on the bundh of farmers by Agriculture Department | कृषी विभागातर्फे शेतकºयांच्या बांधावर धान रोवणीचे प्रात्याक्षिक

कृषी विभागातर्फे शेतकºयांच्या बांधावर धान रोवणीचे प्रात्याक्षिक

Next
ठळक मुद्देउन्नत शेती व समृद्ध शेतकरी अभियान : सिंदेवाही तालुक्यात २५ शेतकºयांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती व समृध्द शेतकरी’ अभियानाअंतर्गत सिंदेवाही मंडळ क्षेत्रात ९ गावांची निवड करण्यात आली. या अभियानातंर्गत प्रात्याक्षिकासाठी २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. त्यांना पीकेव्ही एचएमटी धान बियाणे व पीकेव्ही तारा तूर बियाण्याचे वाटप केले. यावेळी शेतकºयांच्या बांधावर प्रात्याक्षीक प्रयोगाने ‘श्री’ पद्धतीने धान लागवड करून एकात्मिक कीड व्यवस्थापन, सापळा पिके, जैवीक खते याविषयी माहिती देण्यात आली.
तसेच शेतकºयांना बीज परीक्षण व बीज प्रक्रिया, मृद आरोग्य पत्रिका, गादी वाफे रोपे लागवडीबाबत प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस.एम. बागुल, मंडळ कृषी अधिकारी जे.जी. भिसे व कृषी सहाय्यक एस.पी. पांंढरकर यांनी शेतकरी माधव आदे, रवि भरडकर, महादेव मोहुर्ले व इतर शेतकºयांच्या बांधावर मार्गदर्शन केले.
श्री पद्धती लागवडीचे तंत्रज्ञान २४ बाय २५ से.मी. अंतरावर रोपे लागवड करणे, एका चुडात १ ते २ रोपे लावणे तसेच युरिया ब्रिगेडचा वापर केल्यास उत्पन्नात फायदा होतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बांधावर शेतकरी, शेतमजूर महिला उपस्थित होते.

Web Title: Paddy Rovani Pratikshakkha on the bundh of farmers by Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.