पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:00 AM2021-11-11T05:00:00+5:302021-11-11T05:00:21+5:30

सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले.

Padham of five Nagar Panchayat elections | पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायत  निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. येत्या १२ नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेशही जारी केले.  
सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले.सावली नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी मूल, पोंभुर्णासाठी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, गोंडपिपरीसाठी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, कोरपनासाठी उपविभागीय अधिकारी राजुरा आणि जिवतीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रपूर हे आरक्षणसोडतीसाठी नियुक्तलेले पीठासीन अधिकारी आहेत. आरक्षण सोडत शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता संबंधित नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्या-जिल्हाधिकारी 
भारत निवडणूक आयोगाने  १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला.  त्यानुसार १ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी तर ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे तसेच निकाली काढण्यात येईल. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक व अन्य पात्र नागरिकांनीही या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

८२६ ग्रामपंचायतींत विशेष ग्रामसभा
चंद्रपूर :  मतदार नोंदणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती किंवा नोंदीत दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नाव नव्याने नोंदविण्यासाठी विहित अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येतील.  ग्रामपंचायत कार्यालयात आधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फार्मचे नमुने उपलब्ध करून देण्यात येत आहे. मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरित मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावांची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेली नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात येईल. याच दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे ग्रामसभेत उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारणार आहेत.  मतदार यादीत नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांना संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

 

Web Title: Padham of five Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.