लवकरच खुले होईल ताडोब्‍यातील पदमापूर गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:25 PM2021-06-14T12:25:30+5:302021-06-14T12:26:01+5:30

Chandrapur News ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पद्‌मापूर गेट आता लवकरच खुले केले जाणार आहे. सकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यंत नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

The Padmapur Gate in Tadobra will open soon | लवकरच खुले होईल ताडोब्‍यातील पदमापूर गेट

लवकरच खुले होईल ताडोब्‍यातील पदमापूर गेट

Next
ठळक मुद्देमुनगंटीवारांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश

 लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पदमापूर गेट नागरिकांसाठी खुले करण्‍याचे निर्देश विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनाधिकाऱ्यांना शनिवारी झालेल्‍या एका बैठकीत दिले असून, पद्‌मापूर गेट आता लवकरच खुले केले जाणार आहे. सकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यंत नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पद्मापूर गेटमधून सर्वसामान्‍य नागरिकांना काही दिवसांपासून वनाधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला होता. याचा त्रास मोहुर्ली आगरझरी येथील नागरिकांना होत असताना, या क्षेत्रात असलेल्‍या बटरफ्लाय गार्डन, नॅशनल पार्क इत्‍यादी ठिकाणी पर्यटन करणे कठीण बनले होते. नागरिकांनी आर. एफ. ओ. मून यांच्‍याबाबतही तक्रार नोंदविली होती. आ. मुनगंटीवारांनी वनाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प कोअर प्रमुख रामगांवकर, मोहुर्ली आगरझरी या गावातील नागरिक, काँग्रेस नेते विनोद दत्‍तात्रय, विनोद सातपुते, अशोक चौधरी, सोमनाथ टेंभुर्णे, दिलीप कातकर, रिसोर्ट व होमस्‍टेचे संचालक उपस्थित होते. पद्‌मापूरहून मोहुर्लीला जाणाऱ्या पदमापूरजवळील गेट रात्री १० ते सकाळी ७ या कालावधीत बंद ठेवण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. यासोबतच त्‍या विभागाचे आर.एफ.ओ. बदलविण्‍याचे सूचित करून देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांशी चांगली वागणूक ठेवण्‍यासाठी पदमापूर गेटवर प्रशिक्षित मुले, मुली ठेवण्‍याच्‍याही सूचना केल्‍या. याच गेटवर ताडोबाबद्दल माहिती देणारी माहितीपुस्तिका क्‍यु. आर. कोडसह पर्यटकांना उपलब्‍ध करून द्यावी, पर्यटकांनी नुसते पर्यटन न करता पर्यावरणाचे योध्‍दे व्‍हावे, त्‍यादृष्‍टीने योजना करावी, असेही त्‍यांनी निर्देश दिले.

यावेळी वन अधिकारी रामगावकर यांनी, ताडोबा प्रकल्‍प ताबडतोब सुरू करून जुलैपर्यंत सुरू राहावा, अशी विनंती केल्‍यावर आ. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात भारत सरकारच्‍या पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्‍याचे भरीव आश्‍वासन दिले. मध्‍य प्रदेशच्‍या धर्तीवर हॉट एअर बलून सुरू करण्‍यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करण्‍यात येईल. या सर्व मुद्द्‌यांवर वन विभागाच्‍या मुख्‍य सचिवांसोबत बैठक घेण्‍याचेही आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले.

Web Title: The Padmapur Gate in Tadobra will open soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.