रामाळाच्या संवर्धनासाठी चित्रकारांनी हाती घेतला कुंचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:26+5:302021-02-27T04:37:26+5:30
चंद्रपूर : ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त व खोलीकरण करण्यासह इतर मागण्या घेऊन इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी रामाळा ...
चंद्रपूर : ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त व खोलीकरण करण्यासह इतर मागण्या घेऊन इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी रामाळा तलाव परिसरात अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने पेंटिंग काढण्यात आली. यातून जलप्रदूषण झाल्यास अशी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते, याचे चित्रण केले आहे.
गुरुवारी सकाळी कला शिक्षक उपोषण मंडपात दाखल झाले. तलावाच्या काठावर बसून त्यांनी जलप्रदूषण, पाण्याचे महत्त्व आणि शहराचा इतिहास आपल्या कुंचल्यातून अधोरेखित केला. रामाळा तलाव प्रदूषणमुक्त होवो, याकरिता स्वेच्छेने पोस्टरनिर्मिती करून सत्याग्रहास समर्थन दर्शविले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष किरण पराते, सचिव कार्तिक नंदूरकर, विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन बारापात्रे, शहर अध्यक्ष योगेश पेंटेवार, किरण कंत्रोजवार, देवा रामटेके, स्वामी साळवे, संजय अंड्रस्कर, संजय सोनुने, शशिकांत वांढरे, सुहास दुधलकर, सुहास ताटकंटीवार तसेच इतर कलाशिक्षक उपस्थित होते.