भद्रकला महोत्सवात विदेशातील पेंटींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:58 PM2018-02-19T23:58:51+5:302018-02-19T23:59:13+5:30
शहरात प्रथमच जागतिक स्तरावर साईप्रकाश अकादमीच्या वतीने भरविण्यात आलेल्या विविध कला प्रदर्शनाचे व भद्रकला महोत्सवाचे आयोजन गवराळा गणेश मंदिर परिसरात करण्यात आले होते.
आॅनलाईन लोकमत
भद्रावती : शहरात प्रथमच जागतिक स्तरावर साईप्रकाश अकादमीच्या वतीने भरविण्यात आलेल्या विविध कला प्रदर्शनाचे व भद्रकला महोत्सवाचे आयोजन गवराळा गणेश मंदिर परिसरात करण्यात आले होते. या महोत्सवात देश-विदेशातील कलावंतांना आपला सहभाग दर्शविला.
या भद्रकला महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार महेश शितोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, जगन्नाथ गावंडे, नगरसेवक प्रशांत कारेकार, रामु भलमे आदी उपस्थित होते. भद्रकला महोत्सवात स्वित्झरलॅन्ड येथील प्रसिद्ध फोटोग्राफर अन्ॅटोनी डेगोलीन, कलकत्त्याचे आर्टीस्ट दिवाकर दास यांची विशेष उपस्थिती होती. देश-विदेशातील ७० पेंटिंग्जचे महोत्सवात प्रदर्शन लावण्यात आले. विदेशातील प्रख्यात शिल्पे, पदक, चलन यासह विविध कलाकृतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दिवसभर चाललेल्या भद्रकला महोत्सवाची सांगता रात्री करण्यात आली. या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी साहित्यिक बळवंत भोयर, माधव स्वार, युवराज धानोरकर, रवींद्र पारखी, विशाल बोरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बाहेरून आलेले परीक्षकांचाही सत्कार करण्यात आला.