चिऊताईसाठी चंद्रपूर बचाव समितीचे पाखरमाया अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:30+5:302021-03-20T04:26:30+5:30
२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळल्या जातो. मात्र मागील काही वर्षांमध्ये सिमेंट इमारतींच्या जंगलांमध्ये चिमण्या नामशेष होण्याच्या ...
२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळल्या जातो. मात्र मागील काही वर्षांमध्ये सिमेंट इमारतींच्या जंगलांमध्ये चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या चिमण्यांना हक्काची जागा मिळावी, त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने पाखरमाया अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे पाणी तसेच चाऱ्याअभावी चिमण्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येकांनी आपल्या छतावर दाणापाणी ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, यासाठी बांबूपासून तयार केलेले आणि चिमण्यांसाठी उपयुक्त ठरणारे दाणा-पाणी भांडेही चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने उपलब्ध करून दिले असून शहरातील गांधी चौक तसेच बापट नगरमध्ये मागणीनुसार नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांना दाणापाणी टाकावे, अशी विनंतीही पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेला चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा, उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महेंद्र राळे, विलास माथनकर, शिरीश हलदर आदींची यावेळी उपस्थिती होती.