पळसगाव-कूचना रस्त्याची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:50+5:302021-07-09T04:18:50+5:30
डॉ. अंकुश आगलावे फोटो कूचना : भद्रावती तालुक्यातील माजरी-पाटाळा जिल्हा परिषद क्षेत्राचा आरसा म्हणून ओळख असलेल्या पळसगाव-कुचना या ...
डॉ. अंकुश आगलावे
फोटो
कूचना : भद्रावती तालुक्यातील माजरी-पाटाळा जिल्हा परिषद क्षेत्राचा आरसा म्हणून ओळख असलेल्या पळसगाव-कुचना या अंदाजे दोन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या शेतकरी बांधवांना त्याचबरोबर दुचाकी आणि छोट्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे छोटे-मोठे अपघात हे रोजचेच झाले आहे. कारण रेती, विटा व मुरुमांची क्षमतेपेक्षा जास्त टनाची वाहतूक होत असल्याने आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्याचे हे हाल झाले, असे स्थानिकांचे मत आहे.
वेकोलिच्या सीएसआर फंडातून आणि जिल्हा परिषदच्या फंडातून लाखो रुपये खर्च करूनही कंत्राटदारांच्या हयगयपणामुळे हा रस्ता आणखी खराब होत असून तत्काळ चौकशी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपचे डॉ. अंकुश आगलावे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
080721\img_20210708_155450.jpg
पडलेले खड्डे