पंचायत समितीतर्फे १०० महिला बचत गटांना सतरंजीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:21+5:302021-06-26T04:20:21+5:30

भद्रावती : जिल्हा निधी योजना जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावती येथील महिला बचत गटांना सतरंजीचे वाटप करण्यात ...

Panchayat Samiti distributes Sataranji to 100 women self help groups | पंचायत समितीतर्फे १०० महिला बचत गटांना सतरंजीचे वाटप

पंचायत समितीतर्फे १०० महिला बचत गटांना सतरंजीचे वाटप

Next

भद्रावती : जिल्हा निधी योजना जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती भद्रावती येथील महिला बचत गटांना सतरंजीचे वाटप करण्यात आले.

पंचायत समिती भद्रावती येथील सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे सदस्य अर्चना जीवतोडे, सदस्य यशवंत वाघ, पंचायत समिती सदस्य चिंतामण आत्राम, संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, कृषी अधिकारी सुशांत गडेवार उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सदर दरीपंजीचा वापर महिला सभा, महिलांचे कार्यक्रम यासाठी करून बचत गट सक्षम करावे, असे आवाहन केले. शंभर महिला बचत गटांना सतरंजीचे वाटप करण्यात आले. वटपौर्णिमेचे औचित्य साधून पंचायत समिती परिसरात महिलांच्या हस्ते वड, कडूलिंब आदी वृक्ष लागवड करण्यात आली. संचालन विस्तार अधिकारी प्रणाली खोब्रागडे यांनी केले. आभार मनोहर कापकर यांनी मानले.

Web Title: Panchayat Samiti distributes Sataranji to 100 women self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.