पांदण रस्त्याच्या पाईप कामात सावळागोंधळ

By admin | Published: October 13, 2016 02:26 AM2016-10-13T02:26:26+5:302016-10-13T02:26:26+5:30

चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडपिपरी, पुयारदंड गट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी एमआरई जिस अंतर्गत गावातील पांदण रस्त्याची कामे केली.

Pandan street pipe work | पांदण रस्त्याच्या पाईप कामात सावळागोंधळ

पांदण रस्त्याच्या पाईप कामात सावळागोंधळ

Next

गडपिपरी-पुयारदंड रस्ता : ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी
चिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडपिपरी, पुयारदंड गट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी एमआरई जिस अंतर्गत गावातील पांदण रस्त्याची कामे केली. रस्त्यात सिमेंटचे पाईप टाकण्यात आले. कामाचे बिलही उचलण्यात आले. मात्र ग्रामसेवकाने कुठल्याही प्रकारची निविदा न काढता परस्पर काम केले. उचल केलेल्या बिलात तफावत असून झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात अनियमितता असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
एमआरईजीएस अंतर्गत पांदन रस्त्याचे काम सन २०१४-१५ ला करण्यात आले. भिसी-शंकरपूर रोड ते गुंडेराव थुटेपर्यंत व गोडणगाव ते लक्ष्मन भोयर कन्हाळगाव पादंन रस्त्यामध्ये सिमेंट पाईप टाकण्यात आले. या पाईपसाठी एक लाख २० हजार रुपयांची उचल केली. मात्र या कामाची कुठलीही निविदा काढण्यात आली नाही व ग्रामपंचायतला विश्वासात सुद्धा घेण्यात आले नाही. परस्पर स्वमर्जीने काम केले. सदर काम पूर्णता निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात अनियमितता असून कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.
पुयारदंड येथील सरपंच वसता जांभुळे यांनी निवडणूक लढविली, तेव्हा त्यांच्याकडे शौचालय नव्हते. बेसलाईनला त्यांच्याकडे शौचालय नसल्याची नोंद आहे. तरीही जांभुळे व ग्रामसेवक मिसाळ यांनी संगणमत करुन शौचालय असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करुन प्रशासनाची दिशाभूल करीत फसवणूक केली व सन २०१६-१७ या वर्षात शौचालय मंजूर केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य अश्विन प्रफुल उर्फ अमोल पाटील यांच्याकडे शौचालय नसतानाही ग्रामसेवकाने निवडणुकीत प्रमाणपत्र दिले. या संदर्भात सरपंच रंजना पाटील व कुंदा वानखेडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार दोनदा दिली. मात्र ग्रामसेवकांवर अजूनही कारवाई झाली नाही. तर ग्रामसेवक २७ जानेवारी, १५ आॅगस्ट व १ मे महाराष्ट्र दिनाच्या खास ग्रामसभा न घेता गैरहजर असल्याचेही डांगे यांनी परिषदेत सांगितले. ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी प्रसिद्ध पत्रकातून माध्यमांना दिलेली माहिती खोटी व चुकीची असून प्रशासनाची दिशाभूल करणारी आहे. माध्यमाद्वारे मिसाळ यांनी माझ्यावर खंडणी मागण्याचा आरोप केला आहे. आपण जर खंडणी मागितली असेल तर ग्रामसेवकांनी स्वतंत्र चौकशी लावावी. ग्रामसेवक मिसाळ यांच्याशी आपण कधीही प्रत्यक्ष बोललो नाही. मात्र ग्रामसेवक मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून खोटी माहिती पुरवून माझी बदनामी केली असल्याचे सांगत एमआरईजीएसच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या व आपले वरिष्ठ मंत्र्यांशी संबंध असल्याचे भासवून दबाव आणणाऱ्या ग्रामसेवक मिसाळ यांना निलंबित करण्याची मागणी विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
पत्रकार परिषदेला बोथलीचे उपसरपंच तानाजी सहारे, कमलाकर बोरकर, अजित सुकारे, रमेश मिलकर, सूर्यभान खोब्रागडे, कवडू धानोरकर, संतोष कामडी, सचिन खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलनातून माझ्यावर लावलेल्या आरोपाचे प्रथम पुरावे सादर करावे, नंतरच नवीन आरोप करावे. गडपिपरी, पुयारदंड, गट ग्रामपंचायतीच्या पांदन रस्त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. कामाचे कोटेशन काढण्यात आले. सरपंच वसंता जांभुळे यांची शौचालयाची पेंडींग फाईल होती. अनावधनाने शौचालय मंजूर झाले. मात्र त्याच्या कामाचे बिल रोखून धरले आहे. अश्विनी प्रफुल उर्फ अमोल पाटील यांच्या घराची शहानिशा करुनच शौचालयाचे प्रमाणपत्र दिले. माझ्याकडे दोन ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने वेळेअभावी एकाच ग्रामसभेला हजर राऊ शकतो तर दुसऱ्या ग्रामसभेला जाता येत नाही.
- लक्ष्मन मिसाळ, ग्रामसेवक गडपिपरी, पुयारदंड

Web Title: Pandan street pipe work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.