पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेला प्रारंभ
By admin | Published: June 5, 2017 12:27 AM2017-06-05T00:27:09+5:302017-06-05T00:27:09+5:30
पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेच्या प्रारंभ तुकूम मंडळ प्रभागातून झाला आहे.
घरोघरी पोहचणार : केंद्र, राज्य सरकारच्या योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेच्या प्रारंभ तुकूम मंडळ प्रभागातून झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना चंद्रपूरकाराना सांगण्यात येत आहे. यावेळी चंद्रपूरकरांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकारचा अनेक योजना आहे. परंतु योजनांची माहिती मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय वर्ष शताब्धी निमित्य घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजनाची माहिती देण्यात येत आहे. याची सुरवात तुकूम मंडळ प्रभाग १ मध्ये झाली. यावेळी भाजप नेते व नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, नगरसेविका शिलाताई चव्हाण, नगरसेविका मायाताई उईके, मंडळ महामंत्री अमीन शेख, पुरुषोत्तम सहारे, धनरे पाटील, विजय ठाकरे, कुंदा कोटरंगे, प्रज्ञा बोरगमवार, अजय त्रिशूळवार, अमोल तंगडपलीवर, संजय कोतावार, विजय ठाकरे, शुभांगी वैद्य,वामनराव निदेकर, गणपतराव पिदूरकर, शिवाली देवतले, नामदेवराव कचाटे यांची उपस्थिती होती. तुकूम प्रभाग क्र. १ मध्ये प्रत्येक घरी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जीवनचरित्र, केंद्र व राज्य सरकारची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागाचा समस्या नगरसेवकांनी येकून घेतल्या. या समस्या लवकर निकाली काढण्याचे आश्वासन नगरसेवकांनी दिले.