काँग्रेस पक्षातर्फे पंडित जवाहरलाल नेहरु जयंती
By Admin | Published: November 15, 2016 12:49 AM2016-11-15T00:49:21+5:302016-11-15T00:49:21+5:30
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस १४ नोव्हेंबर हा संपूर्ण देशात ‘बालक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
चंद्रपूर : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस १४ नोव्हेंबर हा संपूर्ण देशात ‘बालक दिन’ म्हणून साजरा केला जातो. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या वतीने सोमवारी दुपारी १२ वाजता स्थानिक गांधी चौक येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, चंद्रपूर शहर महानगरपालिकेमधील काँग्रेसचे गटनेता प्रशांत दानव, उपगटनेता महेंद्र जयस्वाल, नगरसेविका उषाताई धांडे, सकीना अन्सारी, रत्नमाला बावणे, सायराबानू काजी, रेखा वैरागडे, छाया बरडे, ठाकूर, संजीवनी जोशी, मुस्तरी वहीद शेख, कामगार नेता चंद्रशेखर पोडे, सुधाकरसिंह गौर, अरुण बुरडकर, अनंता हुड, रमजान अली, असलमभाई, अशोक आक्केवार, बाबुलाल करुणाकर, श्रीनिवास पारनंदी, शंकर बल्लपवार, अविनाश बुरडकर, विजय दैवलकर, अशोक निखाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी पं. नेहरु यांच्या प्रतिमेला मालार्पण व पुष्पार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गावंडे गुरुजी व आभार प्रदर्शन चंद्रशेखर पोडे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)