रानडुकराची शिकार; पाच जणांना अटक
By admin | Published: December 8, 2015 12:47 AM2015-12-08T00:47:05+5:302015-12-08T00:47:05+5:30
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रानडुकराची शिकार करणाऱ्या पाच आरोपींना सावली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
सावली : वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रानडुकराची शिकार करणाऱ्या पाच आरोपींना सावली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
सावली वनपरिक्षेत्र अधिनस्त असलेल्या बेलगाटा येथील जंगलात गस्त करीत असताना टॉर्चच्या प्रकाशात चार ते पाच लोकांचा समूह पाण्याच्या नहराकडे रस्त्याच्या कडेला धावत जाताना दिसला. त्यांचा पाठलाग करुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. यात त्यांनी रानडुकराची शिकार केल्याचे आढळून आले. यात आरोपी वामन नामदेव कोवे (३५), साईनाथ विश्वनाथ गेडाम (४०), भूमीदास पत्रू नैताम (४०), रोशन इंदरशाह कोवे (२९), प्रकाश रामचंद्र कोवे (४७) रा. बेलगाटा या आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एस. पी. ठाकरे, विभागीय वनाधिकारी आर. टी. धाबेकर, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. डब्ल्यू. मोरे यांच्या मार्गदर्शनात सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. पी. राठोड, क्षेत्रसहाय्यक आर. ई. खोब्रागडे, एस. डी. येलकेवाड, आर. एन. तांबरे, आर. जी. कोडापे, बी. डी. चिकाटे, वनरक्षक एन. व्ही. निरंजने, ए. एम. देवगडे, पी. डी. भेंडाळे, एस. एम. नन्नावरे, एस. एम. देठेकर, एम. जी. घोडमारे, एम. आर. कोहाळे, एन. आर. कंटकावार, यु. व्ही. नागरे, एन. सी. रासेकर यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)