फलकांनी शहराच्या सौदर्यात बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:52+5:302020-12-30T04:37:52+5:30
कोंडवाड्यांची अवस्था अतिशय गंभीर चंद्रपूर : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती ...
कोंडवाड्यांची अवस्था अतिशय गंभीर
चंद्रपूर : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छपर पूर्णपणे उडून गेले आहे.
सावली शहरात बगीचाची आवश्यकता
सावली : शहरात सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक फिरायला जात असतात. मात्र शहरात कुठेही बसण्यासाठी बगीचा नसल्याने शहरात बगीचा तयार करण्याची मागणी होत आहे. नगर पालिकेमध्ये असलेला शहरातील एकमेव बगीचाही नष्ट झाला आहे.
सौरदिवे दुरूस्तीकडे झाले आहे दुर्लक्ष
जिवती : अतिदुर्गम भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु, अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सौरदिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
योजनांची माहिती नागरिकांना द्या
चंद्रपूर : शासनाकडून सामान्य नागरिकांसाच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्याच्या कामाची चौकशी करावी
राजोली: येथील बसस्थानक ते रेल्वे गेटपर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून सळाखी बाहेर आल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. गावातील इतरही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
रोजगार हमीची
कामे सुरु करा
चंद्रपूर: जिल्ह्यात शेतीचा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. शेतमजुरांच्या हाताला काम मिळण्याची शक्यता नाही. उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे रोजगार हमीची कामे सुरु करावी, अशी मागणी आहे.
पन्न्या टाकणाऱ्यांवर कारवाई नाही
चिमूर : नगर पालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढºया प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लास्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात.अशांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सावलीत मोकाट जनावरांचा हैदोस
सावली : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व रहादारी करणाºयांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते.