पानतावणे यांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:14 PM2018-03-31T23:14:20+5:302018-03-31T23:14:20+5:30
अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे कार्य साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या लेखनीला आंबेडकरी विचारांची जोड दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे कार्य साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या लेखनीला आंबेडकरी विचारांची जोड दिली. हे ऐतिहासिक कार्य अथक परिश्रमातून कृतिप्रवण केले, या शब्दात पानतावणे यांचा गौरव केला. आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशनच्या वतीने पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अध्यक्षस्थानी पी. व्ही. मेश्राम तर मंचावर प्रवीण खोब्रागडे, खुशाल तेलंग, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. मेघमाला मेश्राम, डॉ. प्रमोद शंभरकर, कोमल खोबरागडे, डॉ. इसादास भडके आदी उपस्थित होते.
अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यानंतर काय? असा प्रश्न डॉ. बन्सोड यांनी उपस्थित केला. ‘अस्मितादर्श’ अव्याहतपणे सुरू ठेवणे गरजेचे असून यातूनच प्रबोधनाची व्याप्ती वाढणार आहे. डॉ. मेश्राम यांनी यांनीही आंबेडकरी चळवळीतील योगदानाचे मूल्य अधोरेखित केले. अस्मितादर्शने आंबेडकरी चळवळीला बळ दिले, असे मत खोबरागडे यांनी मांडले. पानतावणे यांचे चंद्रपूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज खोबरागडे यांनी नोंदविली. पानतावणे यांनी वादळाच्या वंशजांचा शोध घेवून विद्रोहाचे पाणी पेटवले, अशी भूमिका तेलंग मांडली. य् अस्मितादर्शने अनेक पिढ्या घडविल्या. परिवर्तनाची व्याप्ती वाढविली, असे निरीक्षण डॉ. शंभरकर यांनी नोंदविले. सभेचे संयोजक डॉ. भडके यांनी पद्मश्री पानतावणे यांच्या कार्याचा गौरव केला शुद्धोधन मेश्राम यांनी संचालन केले. नागेश सुखदेवे यांनी आभार मानले. यावेळी विलास दुर्गे, प्रा. डॉ. रविंद्र मुरमाडे, ताराबाई मेश्राम, त्रिलोक शेंडे, सुरेश रामटेके, गोपी मित्रा, राजाभाऊ खोबरागडे, सीमा भसारकर, बी.सी. नगराळे, अंकुश वाघमारे, प्रा. अशोक बन्सोड, नितीन रामटेके उपस्थित होते.