पंचमुखी हनुमान मंदिरात पारायणपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:32 AM2021-09-14T04:32:47+5:302021-09-14T04:32:47+5:30

बल्लारपूर : श्री संत गजानन महाराजांच्या संजीवनी समाधीला १११ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी श्री संत गजानन महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच ...

Parayanpath in Panchmukhi Hanuman Temple | पंचमुखी हनुमान मंदिरात पारायणपाठ

पंचमुखी हनुमान मंदिरात पारायणपाठ

Next

बल्लारपूर : श्री संत गजानन महाराजांच्या संजीवनी समाधीला १११ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी श्री संत गजानन महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच ऋषीपंचमी भक्तिभावाने साजरी केली जाते. कोरोना संकटामुळे कोविड नियमांचे पालन करून स्थानिक सुभाष वॉर्ड जोखुनाला परिसरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानात ऋषी पंचमीनिमित्त पारायणपाठ करण्यात आला.

याप्रसंगी श्री संत गजानन महाराजांना कोरोनाचे संकट संपवण्यासाठी प्रार्थना केली. यापूर्वी श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजाअर्चना करण्यात आली. भाविकांनी श्री गजानन विजय ग्रंथ २१ पारायण केले. तसेच सर्वांनी सुमधुर वाणीतून भजन गायिले.

या वेळी कोमल आर्या, पूनम आर्या, वर्षा सुंचुवार, पौर्णिमा कोतपल्लीवार, शुभांगी तिडके, धनवंत्री आवारी, शीला कठाणे, वैशाली मोटोरे, माया यादव, निकिता खाडे, वंशिता सिंह, ललित घुंगडे, आयुष्य कठणे, कुलदीप सुंचुवार, शंकर पोलगमवार, विजय मुलावार, भाऊराव लेडांगे आदींची उपस्थिती होती. या वेळी श्री गजानन महाराजांचा आवडता प्रसाद झुणकाभाकर महाप्रसादाच्या रूपात वाटण्यात आले.

Web Title: Parayanpath in Panchmukhi Hanuman Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.