बल्लारपुरातील पालकांना हवी मुलांची ऑनलाईन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:33+5:302021-03-04T04:52:33+5:30
या संदर्भात शाळा व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची हे अद्याप ठरले नाही. बोर्डाच्या आदेशानुसारच परीक्षा होईल. ...
या संदर्भात शाळा व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची हे अद्याप ठरले नाही. बोर्डाच्या आदेशानुसारच परीक्षा होईल. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन लवकरच सुरू होणारी अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घ्यावी, असे पालकांचे म्हणणे आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार बल्लारपूर, नगरपरिषद मुख्याधिकारी व पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
गट शिक्षणाधिकारी व बल्लारपूर तालुक्यातील माध्यमिक शाळांना पत्र आले आहे. यामध्ये इयत्ता ५ वी ते ९ वी व इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन व ऑनलाईन परीक्षा आयोजनाचे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. कोरोना परिस्थितीचे भान ठेवून परीक्षा घेण्यात यावी, असे नमूद आहे.
- संघपाल रामटेके, शिक्षक, श्री बालाजी हायस्कूल, बामणी.