शिक्षण शुल्क अधिनियमाविरूद्ध पालकांची नागपुरात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:44 PM2018-11-26T22:44:06+5:302018-11-26T22:44:19+5:30
राज्य सरकारने शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम तयार केले. या अधिनियमात शिक्षणाचे खासगीकरण करून सर्वसामान्य पालकांवर अन्याय केल्याच्या निषेर्धात पॅरेट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रन एजुकेशन (पेस) च्या वतीने चंद्रपुरातील पालकांनी नागपुरात सोमवारी संविधान चौकात सरकारविरूध्द निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य सरकारने शैक्षणिक संस्था शुल्क अधिनियम तयार केले. या अधिनियमात शिक्षणाचे खासगीकरण करून सर्वसामान्य पालकांवर अन्याय केल्याच्या निषेर्धात पॅरेट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रन एजुकेशन (पेस) च्या वतीने चंद्रपुरातील पालकांनी नागपुरात सोमवारी संविधान चौकात सरकारविरूध्द निदर्शने केली.
सरकारने तयार केलेला शिक्षण शुल्क मसुदा खासगी संस्थाचालकांच्या हिताचा आहे. हा मसुदा लागू झाला तर इंग्रजी शिक्षण देणाऱ्या कान्व्हेंटची मनमानी पुन्हा वाढेल. त्यामुळे विधेयकातील जाचक तरतुदी रद्द करण्यासाठी पालकांनी संविधान चौकात निदर्शने केली. यावेळी विदर्भातील अन्य जिल्ह्यांचे पालकही सहभागी झाले होते.