पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:41+5:302021-07-03T04:18:41+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने आयोजित संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी ‘कोविड-१९ ची संभाव्य तिसरी लाट आणि लहान ...

Parents should give mental strength to their children | पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे

पालकांनी मुलांना मानसिक बळ द्यावे

Next

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने आयोजित संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी ‘कोविड-१९ ची संभाव्य तिसरी लाट आणि लहान मुलांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहेरे) यांनी संवाद साधला. यावेळी मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी सहभाग घेतला.

डॉ. गावतुरे म्हणाल्या, दुसऱ्या लाटेत ८ ते १० टक्के बालक प्रभावित झाले होते. ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. अशा बालकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असते. हृदयरोग, एड्स, उच्च रक्तदाब आणि अन्य आजार असलेल्या बालकांना अधिक धोका असतो. बालकांचे लसीकरण झाल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी होऊ शकतो. साधा ताप आला की आपण मुलांना डॉक्टरकडे घेऊन जातो. अशावेळी आपल्याला कोरोना झाला, अशी मानसिकता लहान मुले करून घेतात. मृत्यूच्या भीतीपोटी नैराश्यतेचे जीवन जगू लागतात. आई-वडिलांचे तणाव मुलांच्या मानसिक आरोग्य परिणाम करू लागते. ते मनातील भीती दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत. अशावेळी मुले चिंताग्रस्त दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. गावतुरे यांनी केले. लहान मुलांना मास्क घालताना श्वास घेता यावा आणि दोन वर्षांखालील बालकांना शक्यतोवर मास्क घालू नये, असे देखील त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

Web Title: Parents should give mental strength to their children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.