पालकांनो, लहान मुलांना जपा, कोरोनाचा धोका वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:42+5:302021-04-05T04:24:42+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाचा धोका अधिकच वाढलेला आहे. गेल्या दीड महिन्यात दहा हजाराच्या जवळपास नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले ...
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाचा धोका अधिकच वाढलेला आहे. गेल्या दीड महिन्यात दहा हजाराच्या जवळपास नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे प्रशासनाने पूर्वीच्या तुलनेत अधिक कठोर नियम लागू केले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्याविरोधांत कारवाई केली जात आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांत आता लहान मुलांनाही कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ४४२ आणि ६ ते १८ वयोगटातील २३८५ अशा एकूण २८२७ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
काळजी घ्या, घाबरू नका
लहान मुलांसाठी अद्याप कुठलीही व्हॅक्सिन निघाली नाही. त्यामुळे ते सुपर स्पेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विनाकारण मुलांना घराबाहेर निघू देऊ नये, गरज असेल तर मास्क घालूनच बाहेर पाठवावे, घरगुती खेळ खेळण्यास सांगावे.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर
----
लहान मुलांना कोरोना होऊ शकतो. मात्र त्यांच्या फुफ्फुसाला इजा होण्याची शक्यता कमी असते. परंतु, ते सुपर स्पेडर ठरु शकतात. त्यामुळे विनाकारण बाहेर पडू देऊ नये, मास्क घालूनच बाहेर पाठवावे, बाहेरील खेळावर निर्बंध लादावे. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे गरजेचे आहे.
-डॉ. अभिलाषा गावतुरे, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर