ब्रह्मपुरीत कॉम्प्लेक्सची पार्किंग रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:56+5:302021-07-31T04:27:56+5:30
रस्ते लहान, वरून अतिक्रमण वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे ब्रह्मपुरी : शहर वाढले; पण रस्ते ‘जैसे थे’ आहेत. नवनवीन कॉम्प्लेक्स झाले; ...
रस्ते लहान, वरून अतिक्रमण
वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे
ब्रह्मपुरी : शहर वाढले; पण रस्ते ‘जैसे थे’ आहेत. नवनवीन कॉम्प्लेक्स झाले; पण कॉम्प्लेक्सला पार्किंग नसल्याने वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे वाहतूक प्रभावित होत आहे.
ब्रह्मपुरी शहरात काही मोजके वाहतुकीचे रस्ते आहेत. त्यात ख्रिस्तानंद चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते जुनी आनंद टॉकीज रोड, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत वाहनधारक व पादचाऱ्यांची नेहमीच गर्दी असते. या प्रमुख रोडवर जे कच्चेपक्के अतिक्रमण झाले असेल, ते ताबडतोब काढणे गरजेचे आहे, तरच वाहतुकीचा प्रश्न काही अंशी सुटण्याची शक्यता गृहीत धरली जाऊ शकते. याबरोबरच या रस्त्यांवर काही व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये कुठेही पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेकदा वाहने रोडवर ठेवली जात असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. सावरकर चौक ते जुनी आनंद टॉकीज हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो, हे विशेष.