संसदीय स्थायी समिती ताडोबातील वाघाच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:35+5:302021-08-20T04:32:35+5:30
राजकुमार चुनारकर चिमूर (चंद्रपूर) : ग्रामविकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, आढावा घेण्यासाठी तब्बल २९ सदस्य आणि खासदारासह निघालेल्या केंद्रीय सदस्य ...
राजकुमार चुनारकर
चिमूर (चंद्रपूर) : ग्रामविकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, आढावा घेण्यासाठी तब्बल २९ सदस्य आणि खासदारासह निघालेल्या केंद्रीय सदस्य समितीचा ताफा चिमूर तालुक्यात बुधवारी दाखल झाला. अनेक वाहनातून कोलरा गेट येथील वन्य विलास रिसॉर्टमध्ये ही समिती दाखल झाली असून गुरुवारी सकाळी संसदीय स्थायी समितीचे काही सदस्य गुरुवारी सकाळी ताडोबातील वाघाच्या भेटीला गेले आहेत.
केंद्र शासनाने घरकुल, एमआरजीएस, बचत गट तसेच केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कितपत होते, यासाठी संसदीय समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांमधील निवडक खासदारांची समिती चिमूर तालुक्यात बुधवारी रात्री ८ वाजता आढावा घेण्यासाठी दाखल झाली. गुरुवारी सकाळी संसदीय स्थायी समितीचे सदस्य यांनी कोलारा बफर गेटमधून तर दुपारी ३ वाजता अलिझंजा गेटमधून ताडोबाची सफारी केली. या सफारीदरम्यान त्यांना वाघाने दर्शन दिले की नाही, हे कळू शकले नाही.
गुरुवारी केंद्रीय स्थायी समिती कमिटीने पर्यावरणाचा आनंद लुटला तर शुक्रवारी चिमूर तालुक्यातील मासळ, कोलारा, मदनापूर, मानेमोहाडी या ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजना, एमआरजीएस, आपले सरकार सेवा योजना या केंद्रीय योजनेबाबत अभ्यास करणार आहेत.
190821\img20210819155456.jpg
केंद्रीय संसदीय स्थाई समिती चिमुर तालुक्यात दाखल झाली त्यामुळे कोलरा ग्रामपंचायत तयारी करताना