पळसगावातील अनेक घरांची अंशत: पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:46+5:30

घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही.

Partial fall of many houses in Palsgaon | पळसगावातील अनेक घरांची अंशत: पडझड

पळसगावातील अनेक घरांची अंशत: पडझड

Next
ठळक मुद्देप्रशासन अद्यापही झोपेतच : आपादग्रस्त कुटुंबांना तात्पुरते इतरत्र हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ बु.: चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोनमध्ये येत असलेल्या सिंदेवाही मार्गावर असलेले पळसगाव जलमय झाले आहे. गावाच्या शेजारी असलेल्या बोडीची पाळ फुटून पाणी गावात शिरले. या पाण्याने गावातील महादेव गावतुरे, मारोती शेंडे, नामदेव झोडे, हरिश्चंद्र गुळधेसह ३० लोकांच्या घरांची पडझड झाली. त्यांना सध्या जिल्हा परिषद शाळा पळसगाव व ग्रामपंचायतमध्ये करण्यात आले आहे.
पळसगावाकडे येणारे सर्व मार्ग पूर्णत: बंद झाले आहेत. सध्या तरी त्यांना प्रशासनातर्फे कोणतीही प्राथमिक सुविधा मिळत नाही. घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही. जोपर्यंत आम्हाला आमचा हक्कच घर बांधून मिळत नाही, तोपर्यंत आमच्या निवासाची सोय प्रशासनाने करावी, अशी मागणी पूरग्रस्त व सरपंच गीता शेंडे, नामदेव गावतुरे, महानंदा गुळधे, अनिल सोनुले, गोकूळ सोनुले यांनी केली आहे.
धानपिके वाहून गेली
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यामध्ये मागील महिन्यापासून आतापर्यंत पाचवेळा जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक वाहून गेले तर अनेकांची घरे पडून इतरत्र राहण्याची वेळ आलेली आहे. मागील महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र जोदार पावसाचे आगमन सुरू असून धानासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात अनेकांचे धान पºहेच पाण्यामध्ये बुडून नष्ट झाले. तर काही शेतकऱ्यांनी इकडून तिकडून धान पºहे आणून कशीबशी रोवणी केली. मात्र पुराच्या पाण्यात सर्व पिके वाहून गेली. पुन्हा बुधवारला नवरगाव - रत्नापूर - सिंदवोहीसह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आणि परिसरातील सर्व मार्गावरून पाणी वाहू लागले. रत्नापूर, शिवणी, वासेरा, गडबोरी, कळमगाव, सिंदेवाही, मेंढा - सिंदेवाही, नवरगाव - गिरगाव, नवरगाव - नेरी व इतर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सर्व मार्ग बंद पडले. रस्त्याने चालणारी वाहतूक सेवा व बसेस बुधवारला ठप्प झाल्या. शिवाय तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून त्याचेही पंचनामे व राहण्याचा गंभीर प्रश्न काही नागरिकांसमोर निर्माण झालेला आहे. बुधवारच्या पाण्यामुळे रत्नापूर येथील किशोर बैस यांचे घर पूर्णत: झुकल्याने धरातील पुर्ण सामान काढून रिकामे करण्यात आले. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर असल्याने तेथील सरपंच सदाशिव मेश्राम व पोलीस पाटील नरेंद्र गहाणे यांनी त्यांची तात्पुरती व्यवस्था शाळेच्या इमारतीत केली.

कालव्याच्या पाण्यात महिला वाहून गेली
संततधार पावसामुळे डोंगरगाव-चारगाव प्रकल्प तुडूंब भरले आहे. या प्रकल्पाच्या कालव्यामधून जोरदार पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील महिला सरिता ईश्वर परचाके (४२) ही चारगावजवळ असलेल्या आपल्या शेतात बुधवारी काम करीत होती. डोंगरगाव प्रकल्पातील पाणी वाहून कालव्याला अचानक पूर आला. या कालव्याचे पाणी सरिता परचाके यांच्या शेतात शिरले. अचानक शेतात पाणी वाढल्याने सरिता परचाके या महिलेने तिथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यातून मार्ग काढताना तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली व वाहून गेली. बुधवारी सायंकाळीच ५०० मीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला.

रामपुरीत भिंत पडून ंिचमुकला ठार

तळोधी : मेंडकीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या रामपुरी गावात मागील अनेक दिवसांपासून पावसाची झड सुरू आहे. अशातच एका घराची भिंत कोसळून चार वर्षीय चिमुकला ठार झाला.
सोहम सचिन वनस्कार असे मृतकाचे नाव आहे. सोहम खाटेवर निवांतपणे झोपून होता. दरम्यान, ओलाव्यामुळे घराची एक भिंत खाटेवरच कोसळली. या भिंतीखाली दबला गेला. लगेच गावकºयांनी त्याला मलब्याच्या बाहेर काढून मेंडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रामपुरी हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तरीय तपासणीकरिता ब्रम्हपुरीला रवाना करण्यात आले.

Web Title: Partial fall of many houses in Palsgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस