विनाअनुदानित शाळांतील वर्गतुकड्या अनुदानास पात्र
By admin | Published: August 23, 2014 11:53 PM2014-08-23T23:53:54+5:302014-08-23T23:53:54+5:30
जिल्ह्यात अनेक शाळा कायम विना अनुदान तत्त्वावर सुरु आहे. यातील काही शाळांनी निकष पूर्ण केल्याने या शाळेतील वर्ग, तुकड्यांना मान्यता देत २० टक्के अनुदानात पात्र ठरविण्यात आल्या आहे.
चंद्रपूर: जिल्ह्यात अनेक शाळा कायम विना अनुदान तत्त्वावर सुरु आहे. यातील काही शाळांनी निकष पूर्ण केल्याने या शाळेतील वर्ग, तुकड्यांना मान्यता देत २० टक्के अनुदानात पात्र ठरविण्यात आल्या आहे. त्यामुळे खासगी शाळांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मागील अनेक वर्षांपासून या शाळा कायम विना अनुदानित तत्त्वावर सुरु आहे. यातील अनेक शाळांनी शासकीय निकष पूर्ण केले सोबतच विद्यार्थी संख्याही वाढविली आहे. अनुदान नसतानाही संस्था तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. २० टक्के अनुदानात पात्र ठरविण्यात आलेल्या शाळांमध्ये सर्वोदय महिला मंडळाद्वारे संचालित हिंदी माध्यमिक विद्यालय, चंद्रपूर, चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित चिंतामणी विद्यालय विसापूर, श्रमजिवी ग्रामीण विकास संस्था पांडूरंग दहिकर विद्यालय, चिमूर, श्री साईबाबा विद्यालय आमडी, तालुका चिमूर, महात्मा फुले विद्यालय महालगाव, मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, लालबहादूर शास्त्री विद्यालय जिवती, सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर, कर्मवीर विद्यालय मुडझा, विवेकानंद माध्यमिक विद्यालय साठगांव, यशवंतराव शिंदे विद्यालय चिंचोडी, स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय नांदगाव, पोडे तालुका बल्लारपूर, हिंग्लाज भवानी हायस्कूल, बाबूपेठ, चंद्रपूर, शरदचंद्र पवार विद्यालय, भेजगाव, शिवाजी हायस्कूल राजुरा, इंदिरा गांधी विद्यालय, चेकदरूर, ता. गोंडपिपरी, पांडूरंग दहीकर विद्यालय, तळोधी(ना.) तालुका चिमूर, छत्रपती शिवाजी विद्यालय खांबाडा, प्रशांत विद्यालय किटाळी बोरमाळा, तालुका नागभीड, भिवाजी वरभे विद्यालय, बोथली, तालुका चिमूर, सावित्रीबाई फुले विद्यालय, गिरगाव, तालुकाा नागभीड, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर, तालुका कोरपना, प्रभू रामचंद्र विद्यालय नारंडा, तालुका कोरपना यातील काही शाळा आदिवासी तसेच काही शाळा गैरआदिवासी क्षेत्रात येतात. या शाळांना काही प्रमाणात का होईना अनुदान मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)