काँग्रेसच्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडोंचा सहभाग

By admin | Published: December 10, 2015 01:24 AM2015-12-10T01:24:13+5:302015-12-10T01:24:13+5:30

नागपूर येथील विधानभवनावर धडकलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मोर्चात चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीतर्फे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते धडकले.

Participation of hundreds of districts in the Congress rally | काँग्रेसच्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडोंचा सहभाग

काँग्रेसच्या मोर्चात जिल्ह्यातील शेकडोंचा सहभाग

Next

चंद्रपूर : नागपूर येथील विधानभवनावर धडकलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मोर्चात चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीतर्फे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते धडकले. चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे नेतृत्व अध्यक्ष नंदु नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे, प्रदेश सचिव सुनिता लोढीया यांनी केले.
सर्व कार्यकर्ते दीक्षाभूमी येथे सहभागी होवून लोकमत चौक, पंचशील चौक या मार्गाने जावून झीरो माईल्स येथे सभा झाली. याप्रसंगी लाखोच्या संख्येत शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नसिम खान, अब्दुल सत्तार, वर्षा गायकवाड, माजी अध्यक्ष माणीकराव ठाकरे, चारूलता टोकस, आमदार विजय वडेट्टीवार, नागपूरचे अध्यक्ष विकास ठाकरे, सुनिता गावंडे, सुधाकर गनगने, बाळासाहेब शीलवकर, ओमप्रकाश ओझा, संजय कुंभलकर, चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदु नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, अ‍ॅड. विजय मोगरे, सुनिता लोढीया, विजया बांगडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित राहून सहभागी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार यावर अनेकांनी मार्गदर्शन करीत युती शासनाचा समाचार घेतला.
चंद्रपुरातून शाम राजुरकर, मोहन डोंगरे, विनोद संकत, अ‍ॅड. भास्कर दिवसे, अनिल सुरपाम, दीपक कटकोजवार, सुलेमन अली, केशव रामटेके, निखील धनवलकर, राजा काझी, पुरुषोत्तम चौधरी, सागर खोब्रागडे आदी उपस्थित सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Participation of hundreds of districts in the Congress rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.