मध्यस्थी योजनेचा पक्षकारांनी लाभ घ्यावा

By admin | Published: April 2, 2017 12:38 AM2017-04-02T00:38:55+5:302017-04-02T00:38:55+5:30

वाद सामोपचाराने मिटविण्याचे मध्यस्थी हे प्रभावी माध्यम असल्याने पक्षकारांनी न्यायालयातील आपली प्रकरणे ही मध्यस्थीप्रक्रियेद्वारे निकाली काढावी ....

The parties of the mediation plan should take advantage | मध्यस्थी योजनेचा पक्षकारांनी लाभ घ्यावा

मध्यस्थी योजनेचा पक्षकारांनी लाभ घ्यावा

Next

जनजागृती कार्यक्रम : नितीन बोरकर यांचे आवाहन
चंद्रपूर : वाद सामोपचाराने मिटविण्याचे मध्यस्थी हे प्रभावी माध्यम असल्याने पक्षकारांनी न्यायालयातील आपली प्रकरणे ही मध्यस्थीप्रक्रियेद्वारे निकाली काढावी व या योजनेचा लाभ सर्व संबंधित पक्षकारांनी घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन बोरकर यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूरतर्फे शनिवारी जिल्हा न्यायालयातील मध्यस्थी केंद्रामध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी चंद्रपूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन बोरकर होते. मंचावर जिल्हा न्यायाधीश जी.आर. अग्रवाल, न्या. पी.एस. इंगळे, न्या. ए.व्ही. न्या. कुळकर्णी, जी.बी. मार्लीकर आदी उपस्थित होते.
न्या. पी.एस. इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, पक्षकारांना मध्यस्थी योजनेची जास्तीत जास्त माहिती होण्यासाठी व त्यांचा लाभ पक्षकारांना घेता आला पाहिजे. त्यासाठी हा जागृती कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर तर्फे राबवण्यात येत आहे.
संचालन ए.एल. सराफ यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एल.एन. धाबेकर यांनी केले.
या कार्यक्रमास अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड, ए.जी. जोशी, एन.आर. नाईकवाडे, ए.झेड. खान तसेच न्यायाधीश धुळधुळे, खान, शेलके, बन्सोड, राऊत, कुळकर्णी, व मोठ्या प्रमाणात अधिवक्ता, पक्षकार, पीएलव्ही आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी जनबंधू, रत्नपारखी, उपरे, धोटे तसेच समांतर विधी स्वयंसेवक ताजुद्दीन शेख, अनिल ठाकूर आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: The parties of the mediation plan should take advantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.