प्रवासी वाहनचालक, मालकांना अर्थसाहाय्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:21+5:302021-05-20T04:30:21+5:30

चंद्रपूर : गेल्‍या वर्षी मार्च महिन्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्‍यानंतर लॉकडाऊन लावण्‍यात आला. त्‍यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्‍यांत ठप्‍प झालेला ...

Passenger drivers, owners should be financed | प्रवासी वाहनचालक, मालकांना अर्थसाहाय्य द्यावे

प्रवासी वाहनचालक, मालकांना अर्थसाहाय्य द्यावे

Next

चंद्रपूर : गेल्‍या वर्षी मार्च महिन्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्‍यानंतर लॉकडाऊन लावण्‍यात आला. त्‍यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्‍यांत ठप्‍प झालेला व्‍यावसायिक प्रवासी वाहनचालक व मालकांचा व्‍यवसाय सुरू झाला व या वर्षी पुन्‍हा लॉकडाऊन लावण्‍यात आल्‍यामुळे हा व्‍यवसाय ठप्‍प पडला. वर्षभरापासून हा व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे वाहनांवरील कर्ज, इन्शुरन्स, रोड टॅक्‍स यांचा भरणा कसा करायचा, हा प्रश्‍न प्रवासी वाहनचालक, मालकांना पडला आहे.

त्‍यामुळे या घटकांना दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने वाहनांवरील कर किमान एक वर्षासाठी माफ करावा, स्‍कूल बस, स्‍कूल व्‍हॅन यांच्‍यावरील कर माफ करावा व सर्व चालक-मालकांना अर्थसाहाय्य देण्‍यात यावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

बुधवारी सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यावसायिक प्रवासी वाहनचालक व मालकांच्‍या विविध मागण्‍यांच्‍या अनुषंगाने राज्‍याचे परिवहन आयुक्‍त अविनाश ढाकणे यांच्‍यासह ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष तथा भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, व्‍यावसायिक प्रवासी वाहनचालक व मालक संघटनेचे चंद्रपूर जिल्‍हाध्‍यक्ष प्रवीण चिमूरकर, आदींची उपस्थिती होती.

गेल्‍या वर्षभरापासून व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे चालकांचे कंबरडे मोडले आहे. या व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून स्‍वयंरोजगार हा घटक करीत आहे. घरातल्‍या वस्‍तू विकून या व्‍यावसायिकांनी जेमतेम उदरनिर्वाह चालविला. मात्र आता या घटकांना दिलासा देण्‍याची आवश्‍यकता आहे. बँकांच्या हप्त्यांना एका वर्षासाठी मुदतवाढ देणे त्‍याचप्रमाणे वाहने वर्षभरापासून उभी असल्‍यामुळे एका वर्षाचा इन्शुरन्स घेऊ नये, यासाठी आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्‍याशी चर्चा करणार असल्‍याचे आमदार मुनगंटीवार म्‍हणाले. सर्व वाहनांवरील टॅक्‍स एक वर्षासाठी माफ करावा; तसेच स्‍कूल बस आणि स्‍कूल व्‍हॅन यांच्‍यावरील टॅक्‍सदेखील माफ करावा आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्‍या या घटकांना अर्थसाहाय्य देण्‍यात यावे, या संदर्भात परिवहन आयुक्‍तांनी शासनाकडे प्रस्‍ताव पाठवावा, असेही आमदार मुनगंटीवार या बैठकीत म्‍हणाले.

Web Title: Passenger drivers, owners should be financed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.