आंतरराज्य बससेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:56 AM2020-12-04T04:56:13+5:302020-12-04T04:56:13+5:30
चंद्रपूर :लाॅकडाऊननंतर बंद असलेली महामंडळाची बससेवा सुरु झाली. त्यानंतर प्रशासनाने आंतरराज्य प्रवासालाही सुट दिली. चंद्रपूर, वरोरा, राजुरा आगारांनी आंतरराज्य ...
चंद्रपूर :लाॅकडाऊननंतर बंद असलेली महामंडळाची बससेवा सुरु झाली. त्यानंतर प्रशासनाने आंतरराज्य प्रवासालाही सुट दिली. चंद्रपूर, वरोरा, राजुरा आगारांनी आंतरराज्य बस सुरु केली. या बसला प्रवाशी मोठा प्रतिसाद देत असून आर्थिक अडचणीत असलेल्या महामंडळाला काही प्रमाणात का होईना, लाभ होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या अगदी शेजारी तेलंगणा राज्य आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच तेलंगणातील नागिरकांचे मोठ्या प्रमाणात येणे-जाणे सुरु असते. मात्र लाॅकडाऊननंतर बस सेवा बंद करण्यात आली. आता प्रशासनाने शिथिलता देताच बस सेवा सुरु झाली आहे. प्रवाशी मोठ्या प्रमाणात या बसेसला प्रतिसाद देत असल्याने महामंडळाचा फायदा होत आहे.
२५
जिल्ह्यातून आंतरराज्य बसेस धावतात
१५
महाराष्ट्र राज्याच्या बसेस
१०
इतर राज्यांच्या बसेस
या मार्गावर धावतात बस
चंद्रपूर - आदिलाबाद, चंद्रपूर हैद्राबाद, चंद्रपूर आसिफाबाद, चंद्रपूर निजामाबाद, वरोरा आदिलाबाद, राजुरा कागजनगर, राजुरा, आसिफाबाद यासह तेंलगनातून आदिलाबाद- चंद्रपूर, आसिफाबाद-चंद्रपूर, आदिलाबाद राजूरा, कागजनगर-राजुरा या बसफेऱ्या सध्या सुरु आहे.
कोट
लाॅकडाऊन संपल्यानंतर आता आंतरराज्य बसफेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूर आगारातून दररोज १० फेऱ्या केल्या जात आहे. पूर्णक्षमतेचे बसेस सुरु असून मंडळाला आर्थिक लाभ मिळत आहे. यानंतरही काही फेऱ्या सोडण्याचा आम्हचा प्रयत्न आहे.-सचिन डफळे
आगारप्रमुख, चंंद्रपूर
प्रवासांशाचा प्रतिसाद
राजुरा, गडचांदूर, जिवती, गोंडपिपरी या तालुक्यांच्या अगदी शेजारी तेलंगणा राज्याची सिमा असल्याने येथील प्रवाशांची मोठ्या प्रणाणात ये-जा असते. त्यामुळे दोन्ही राज्यातील महामंडळांनी बससेवा सुरु केली आहे. विशेष म्हणजे, शेजारी असल्यामुळे अनेक प्रवासी कामानिमीत्य या चंद्रपूर जिल्ह्यात येतात.
लाॅकडाऊननंतर महामंडळाच्या सर्वच फेऱ्या बंद होत्या. दरम्यान, जिल्हास्तरीय सेवा सुरु झाल्यानंतर आंतरराज्य सेवा बंद होती. मात्र शासनाने परवानगी देताच ही सेवाही सुरु करण्यात आली. चंद्रपूर, राजुरा, वरोरा या आगातून बससेवा सुरु करण्यात आली आहे. तेलंगना राज्य अगदी शेजारी असल्यामुळे याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सर्व जिल्ह्यात आता बसेस सुरू झाल्या आहेत. आंतरराज्य बसेस आपल्या जिल्ह्यात सुरू आहेत का, ही बातमी आपल्याला करायची आहे.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) पॉईंटर्स -
आपल्या जिल्ह्यातून किती आंतरराज्य बसेस धावतात?
महाराष्ट्र राज्याच्या किती?
इतर राज्याच्या किती?
कुठे-कुठे जातात बस?
२) या गाड्यांना प्रतिसाद आहे का? (बॉक्स)
३) आगार प्रमुखाचा कोट