प्रवाशांनी बसस्थानके गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:50 PM2018-11-11T21:50:05+5:302018-11-11T21:50:53+5:30
दिवाळीनिमित्त गावाला अथवा अन्य शहरात जाण्यासाठी प्रवाशांनी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता एसटी महामंडळाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जादा बसेस सोडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवाळीनिमित्त गावाला अथवा अन्य शहरात जाण्यासाठी प्रवाशांनी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता एसटी महामंडळाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जादा बसेस सोडल्या आहेत.
लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज आणि जोडून असलेला शनिवार व रविवारमुळे नोकरदार, कामगार वर्गाने गावाकडची वाट धरली आहे. परिणामी, शनिवारपासून चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, चिमूर, गोंडपिपरी, भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही नागभीड बसस्थानके गर्दीने फुलून गेली होती. नागपूर, पूणे व अन्य मार्गावर धावणाºया शिवशाहीचे तिकीट मिळवण्याकरिता नागरिकांनी रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळाले. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ येथे जाणाºया बसेसही अवघ्या काही मिनिटांतचे हाऊसफुल्ल होत असल्याचे दिसून येत आहेत. ब्रह्मपुरीकडे जाणाºया सर्वच बसेस मागील दोन दिवसांपासून फुल्ल भरून जात आहेत. भाऊबीज सणानिमित्त महिला प्रवाशांची मोठी लगबग दिसून सोमवारपासून नियमितपणे शासकीय कार्यालये सुरू होणार आहेत. बरेच कर्मचारी तालुका व जिल्हास्थळावरून दररोज ये-जा करतात. परिणामी एसटी महामंडळाने त्यादृष्टीनेही काही मार्गांवर जादा बसेसची तयारी केली आहे. एसटी महामंडळाच्या बसस्थानकांवर एकीकडे गर्दी असताना शेकडो प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्याला पसंती देत आहेत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बसेसची संख्या वाढवून तिकीट दरातही नेहमीपेक्षा नवे दर लागू केले आहेत.
हंगामी दरवाढीतही गर्दी
ऐन दिवाळी, भाऊबीज सणाच्या आगमनापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने तिकिट दरामध्ये १० टक्क्याने वाढ केली. ही भाडेवाढ २० नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. दिवाळी व भाऊबीजला स्वत:च्या गावाला जाण्यासाठी अन्य पर्याय नसणारे प्रवाशी जादा तिकीट देऊन एसटीचा प्रवास करत आहेत.
रेल्वेही झाल्या फुल्ल
बसप्रमाणेच नागरिकांनी रेल्वे प्रवासालाही पसंती दिली. त्यामुळे आंध्र प्रदेश, पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकत्ता मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. दिवाळीची धामधूम लक्षात घेऊन रेल्वे विभागाने दक्षिण व उत्तरेकडे धावणाºया गाड्यांमध्ये वाढ केली आहे.