रुग्णांची नाळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:16 AM2018-08-10T00:16:49+5:302018-08-10T00:19:45+5:30

राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या माध्यमातून मंगळवारपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिका व चर्तुथ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांचा संपूर्ण भार कंत्राटी अधिपरिचारिका व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांवर येऊन ठेपला आहे.

Patient cord contracts in the hands of the employees | रुग्णांची नाळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात

रुग्णांची नाळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हातात

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती : कंत्राटी परिचारिका १२ तास कामावर

परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या माध्यमातून मंगळवारपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिका व चर्तुथ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांचा संपूर्ण भार कंत्राटी अधिपरिचारिका व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांवर येऊन ठेपला आहे. परिणामी कंत्राटी अधिपरिचारकांना १२ तास काम करावे लागत असल्याने त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठी धावपड करावी लागत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने मेडिकल कॉलेज झाल्याने तसेच विविध सोई- सुविधा झाल्याने जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याभरातील रुग्ण येत असतात. मात्र मंगळवारपासून राज्य मध्यवती कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक, शिक्षक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य सरकार विरोधात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी व नोव्हेंबर २००५ पासून निश्चित लाभाची पेन्शन योजना लागू करावी, यासह १४ मागण्यांच्या पुर्ततेसाठी तीन दिवसाचा संप पुकारला होता. यामध्ये रुग्णालयातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यामुळे रुग्णांना अडचणी जाण्यांची शक्यता होती. त्यामुळे वरिष्ठांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाºया एन. आर. एच. एम विभागातील आयपीएचएसच्या १६, एसएनसीयूच्या २० व एनसीडीच्या ८ अधिपरिचारिकांवर रुग्णालयाची जबाबदारी सोपविली.
चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध प्रकारचे १२ वॉर्ड आहेत. यामध्ये सकाळ, दुपार व रात्र पाडीत अधिपरिचारिका कार्यरत आहेत. ओपडीमध्ये डॉक्टरकडून रुग्णांची तपासणी झाल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी अधिपरिचारिकेवर येत असते. त्याला डॉक्टरांच्या सल्याने विशिष्ट औषध देणे, इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, त्यातही भरती होणाºया रुग्णांकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. मात्र संपामुळे सर्व अधिपरिचारिका मागील तीन दिवसांपासून कामावर येणे बंद केले आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी कंत्राटी परिचारिकेवर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डात एक- दोन अधिपरिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या परिचारिकांना १२ तास काम करावे लागत आहे.
बेडअभावी रुग्णांना अडचण
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागते मात्र रुग्णालयात बेडची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना खाली झोपवूनच उपचार करावा लागतो. त्यामुळे रुग्णाला त्रास होत आहे.
मेडीकलच्या अप्रशिक्षित विद्यार्थ्यांकडून उपचार
संप असल्यामुळे कंत्राटी अधिपरिचारिका व नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्याºया विद्यार्थी रुग्णालयात सेवा देत आहेत. मात्र अजूनही त्याचे शिक्षण पूर्ण झाले नसल्यामुळे त्याच्या उपचारावर किंवा सेवेवर रुग्णांकडून संशक्ता व्यक्त होत आहे.
वेतन कोण देणार
चंद्रपूर जिल्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात मानधनावर कंत्राटी अधिपरिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. संपामुळे नियमीत व पूर्णवेळ अधिपरिचारिकावर कामावर येणे बंद केल्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी कंत्राटी अधिपरिचारिकेला १२ तास काम करावे लागत आहे. मात्र याचे त्यांना कोणतेही वेतन मिळणार नसल्याची खंत अधिपरिचारिकेने प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.

संपाचा कोणताही परिणामी रुग्णांवर झाला नाही. संपकालावधीत कंत्राटी अधिपरिचारिका व कंत्राटी चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णांवर योग्य तो उपचार सुरु आहे.
- निवृत्ती राठोड,
शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर

कंत्राटी अधिपरिचारिका व कंत्राटी चर्तुथ श्रेणी कर्मचारी कामावर आहेत. त्यासोबतच नर्सिगचे विद्यार्थीही रुग्णालयात सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचार सुरु आहे.
- यु. व्ही. मुनघाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी

Web Title: Patient cord contracts in the hands of the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य