रुग्ण मृत्यूंनी जिल्हा हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:27 AM2021-04-06T04:27:18+5:302021-04-06T04:27:18+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्हा हादरला असून मागील २४ तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, वरोरा ...
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्हा हादरला असून मागील २४ तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, वरोरा येथील ३५ तर ब्रह्मपुरी येथील ३४ वर्षीय तरुणाच्या मृत्यूसह अन्य तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ७७८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहे. सोमवारी एका दिवशी तब्बल २६५ नव्या रुग्णांची यामध्ये भर पडली आहे.
सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर, वरोरा, चिमूर हे हाॅटस्पाॅट ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेजारी असलेल्या नागपूर, यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नागपूरमध्ये तर उच्चांकी पातळी गाठली आहे. चंद्रपूर-नागपूर आवागमन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. खासगी तसेच एसटी महामंडळाच्या बसेससुद्धा सुरू असल्यामुळे बहुतांश प्रवासी सुरक्षा साधनांचा वापर न करताच प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात आणखी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात मागील २४ तासात २०७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर २६५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २९ हजार ३७१ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २६ हजार १५३ झाली आहे. सध्या २७७८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ८२ हजार ६९२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ५० हजार ११६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
असे आहे मृत रुग्ण
सरदार पटेल वाॅर्ड वरोरा येथील ३५ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ३४ वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील ७७ वर्षीय व ६६ वर्षीय पुरुष तसेच बल्लारपूर येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४० बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४००, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
बाॅक्स
असे आहे बाधित
चंद्रपूर पालिका ९२
चंद्रपूर तालुका १७
बल्लारपूर ०९
भद्रावती ०३
ब्रह्मपुरी १०
सिंदेवाही ०३
मूल १०
सावली ०७
राजुरा ०७
चिमूर ३५
वरोरा ५२
कोरपना १५
जिवती०१
इतर ०४
बाॅक्स
नवे पॉझिटिव्ह
२६५
कोरोनावर मात
२६,१५३
ॲक्टिव्ह रुग्ण
२७७८