एका कॉलवर मिळते रूग्णाला मोफत रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:55+5:30

पैशाने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येत नाही. विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असूनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मिळत नाही. गरीबांचे तर हाल होतात. वेळीच रक्त न मिळाल्याने रूग्णाला प्राण गमवावा लागतो. ही अनेक रूग्णालयातील वस्तुस्थिती आहे.

The patient gets free blood on one call | एका कॉलवर मिळते रूग्णाला मोफत रक्त

एका कॉलवर मिळते रूग्णाला मोफत रक्त

Next
ठळक मुद्देयुवकांचा समाजोपयोगी उपक्रम : ‘स्वप्नपूर्ती’ रक्तसेवा व्हॉट्सअ‍ॅपग्रुप रूग्णांना वरदान

राजेश बारसागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : रक्तदानाअभावी कुणाचाही जीव जावू नये, या तळमळीने नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील विकास घनशाम बोरकर या युवकाच्या संकल्पनेनुसार ‘स्वप्नपूर्ती’ रक्तसेवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. गरजुंना या ग्रुपवर संदेश पाठविल्यास एका कॉलवर रूग्णाला मोफत रक्त पुरवठा करतो. या उपक्रमामुळे आतापर्यंत शेकडो रूग्णांना जीवनदान मिळाले आहे.
पैशाने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येत नाही. विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असूनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मिळत नाही. गरीबांचे तर हाल होतात. वेळीच रक्त न मिळाल्याने रूग्णाला प्राण गमवावा लागतो. ही अनेक रूग्णालयातील वस्तुस्थिती आहे. याचा अभ्यास करून गरीब, गरजू, सामान्य रूग्णांना वेळीच रक्ताची निशुल्क मदत व्हावी सावरगाव, मांगरूड, तळोधी, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी आदी गावातील मित्र व जागरूक युवकांना एकत्र करून विकासने २४ मे २०१९ रोजी ‘स्वप्नपूर्ती रक्तसेवा’ या समाजोपयोगी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. यासाठी सचिन दिवाकर निकुरे, अनिल शेंद्रे, रोहित अंडेलकर, अनिल बोरूले, भारत चुनारकर आदी युवकांनी मोलाची मदत केली. स्वप्नपूर्तीच्या रुग्णसेवेला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. या माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील सुमारे ४०० हुन अधिक रुग्णांना निशुल्क रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. गरजुंच्या सेवेसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, हे या ग्रुपचे ब्रीद आहे.

शेकडो रुग्णांना मदत
आतापर्यंत शेकडो रूग्णांचे प्राण वाचविण्यात या ग्रुपला यश आले. प्रत्येक सदस्य ध्येयानुसार योगदान देतो. चंद्रपूर, भद्रावती, यवतमाळ, नागपूर गडचिरोली, वर्धा, आरमोरी, ब्रह्मपुरी येथील अन्य आठ ते दहा ग्रुप स्वप्नपूर्ती रक्तसेवा ग्रुपशी जोडण्यात आले. त्यामुळे विदर्भातून कुठल्याही गरजूला रक्ताची मदत अगदी एक ते दीड तासात उपलब्ध होते. या ग्रुपमध्ये २०० हून अधिक रक्तदाते जुळली आहेत.

स्द्यस्थितीत कुणीही, कुठल्याही गरीब गरजू रुग्णांकरिता रक्त हवे असल्यास कॉल करून मदत मिळविता येते. संपर्क झाल्यानंतर कुठल्याही खासगी किंवा शासकीय रुग्णालयात एक ते दीड तासात रक्त उपलब्ध करून दिल्या जात आहे. मी आतापर्यंत २३ वेळा रक्तदान केले. कोविडच्या काळातही ही सेवा सुरूच आहे.
- विकास बोरकर, स्वप्नपूर्ती रक्तसेवा, सावरगाव
ता. नागभीड

Web Title: The patient gets free blood on one call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.