रुग्ण वाढताहेत; तरीही चंद्रपूरकर बेफिकीरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:55+5:302021-04-05T04:24:55+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने धोक्याची पातळी गाठली आहे. रविवारी एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ७४, ...
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने धोक्याची पातळी गाठली आहे. रविवारी एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ७४, ५७ पुरुष तसेच ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आता सर्वांनीच सतर्क होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर कोरोना संसर्गाचे हॉटस्पाट ठरले आहे. दररोज येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. रविवारीदेखील १२४ रुग्ण चंद्रपुरात आढळले. तरीही चंद्रपूरकर गंभीर दिसत नाही. शहरात फेरफटका मारला तर त्यांची बेफिकिरीच दिसून येत आहे.
सध्या जिल्ह्यात २ हजार ७२५ ॲक्टिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात १८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ३६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २९ हजार १०६ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ९४६ झाली आहे. सध्या २७२५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ८२ हजार १५० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ४९ हजार ३३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बाॅक्स
रविवारचे मृत्यू
नागभीड येथील ७४ वर्षीय पुरुष, चिमूर येथील ५७ वर्षीय पुरुष व घुग्घुस येथील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३५ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३९५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
बाॅक्स
असे आहे बाधित रुग्ण
चंद्रपूर महानगर पालिका १२४
चंद्रपूर तालुका ४४
बल्लारपूर १४
भद्रावती १८
ब्रम्हपुरी २४
नागभीड १४
सिंदेवाही ०३
मूल १२
सावली ११
गोंडपिपरी ०३
राजुरा ०६
चिमूर ३१
वरोरा २१
कोरपना १८
जिवती ११
इतर ११
बाॅक्स
३६४ पॉझिटिव्ह रुग्ण
२७२५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह