ब्रह्मपुरीतील रुग्णांना आता चंद्रपूरला यावे लागणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:00 AM2022-03-02T05:00:00+5:302022-03-02T05:00:34+5:30
ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात या वर्षी ट्राॅमा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयू युनिटसुद्धा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही. येथील शासकीय रुग्णालय सर्व सोयी-सुविधांनी अद्यावत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील रुग्णांना अनेकदा गंभीर आजाराच्या उपचारासाठी चंद्रपूर येथे यावे लागते. त्यामुळे ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालय सर्व सोयी-सुविधांनी अद्यावत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगरसेवक विलास विखार, न.प. आरोग्य सभापती प्रीतीश बुरले, नगरसेवक महेश भर्रे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, बंटी श्रीवास्तव, मुन्ना रामटेके उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ब्रह्मपुरी येथील शासकीय रुग्णालयात या वर्षी ट्राॅमा सेंटर सुरू होईल. तसेच ५० बेडचे आयसीयू युनिटसुद्धा मंजूर करण्यात येत आहे. रुग्णालयात कुठलीही कमतरता राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक डॉ. जिवने यांनी केले. संचालन डॉ. कामडी यांनी तर आभार डॉ. पटले यांनी मानले.
दिव्यांगांचा त्रास वाचविला
यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रासाठी चंद्रपूर येथे जावे लागत होते. जाणे-येणे करण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत होता. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना स्थानिक स्तरावर प्रमाणपत्र देण्याच्या उद्देशाने ब्रह्मपुरी येथे काही दिवसांपूर्वी दिव्यांग तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यातील १६० दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले