मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:40+5:302021-02-23T04:44:40+5:30
चंद्रपूर : मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त ...
चंद्रपूर : मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्मचाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त जागा तात्पुरत्या स्वरुपात भरण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून, आरक्षणाशिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपासून मागासवर्गीयांची पदोन्नतीची पदे रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरवठा करून पदोन्नतीच्या रिक्त जागा तातडीने भरण्यासंदर्भात मागणी लावून धरली होती. यामुळे शासनाने नुकताच पदोन्नतीच्या जागा तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. वडेट्टीवार यांनी सातत्याने रिक्त जागा भरण्याची मागणी लावून धरल्याने आणि सलग त्याचा पाठपुरवठा केल्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे आहे.