अधिग्रहित जमिनीचा मोबदला व नोकरी त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:05+5:302021-06-17T04:20:05+5:30
सध्या हा प्रकल्प विविध कारणामुळे रेंगाळत आहे. आता महाजेनको खाणीतील कोळसा घेत असल्याचे वेकोलि अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महाजेनकोचे पत्र ...
सध्या हा प्रकल्प विविध कारणामुळे रेंगाळत आहे. आता महाजेनको खाणीतील कोळसा घेत असल्याचे वेकोलि अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महाजेनकोचे पत्र येत्या दोन दिवसात मिळणार असल्याचे स्पष्ट करून ढोपटाळा यू जी २ चा मार्ग मोकळा होत आहे, असे प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळांना सांगण्यात आले. जर या आठ दिवसांत मोबदला आणि नोकरीच्या कामाला सुरुवात झाली नाही तर प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत खदान, कोळसा वाहतूक बंद करेल, असा इशारा वेकोलि महाप्रबंधक यांना देण्यात आला आहे. शिष्टमंडळात सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, कोलगाव उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, तं.मु. अध्यक्ष प्रकाश भटारकर, मधुकर नरड, विलास भटारकर, राकेश चन्ने, किशोर कुडे, अक्षय निब्रड, दिनेश वैरागडे, लोहबडे, नरड यासह असंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.