दारूबंदी उठविल्यानंतर कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:17+5:302021-07-10T04:20:17+5:30
आता अनेक बीअर बार व देशी दारूची दुकाने सुरू झाली आहे. त्यामुळे दारू दुकानासमोर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ...
आता अनेक बीअर बार व देशी दारूची दुकाने सुरू झाली आहे. त्यामुळे दारू दुकानासमोर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. अनेक नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक विश्वजित शाहा, शंकर वराडकर यांची उपस्थिती होती.
दारू सुरू झाल्याने अवैध दारूविक्री करणाऱ्यांकडून गुन्हेगारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवावे. काही अतिउत्साही मद्यप्रेमींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशांवरही लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षकांना केल्या आहे.