दंड भरू पण विनाकारण फिरू; विनाकारण फिरणारे १७० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:28+5:302021-05-22T04:26:28+5:30
बॉक्स कारणे तीच, कोणाला दवाखाना तर कोणाला भाजीपाला विनाकारण फिरणाऱ्यांची कारणे ठरलेली आहेत. बाजारात भाजी खरेदीसाठी जात आहेत. किराणा ...
बॉक्स
कारणे तीच, कोणाला दवाखाना तर कोणाला भाजीपाला
विनाकारण फिरणाऱ्यांची कारणे ठरलेली आहेत. बाजारात भाजी खरेदीसाठी जात आहेत. किराणा आणण्यासाठी जातोय. दवाखान्यात काम आहे, अशा स्वरूपाची कारणे सांगितली जातात. सर्वाची कारणे जवळपास सारखीच असतात. ज्याची कारणे खरी असतात त्यांना सोडण्याच येते. तर ज्याची खोटे वाटतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.
बॉक्स
जिल्ह्याभरातच राबवली मोहीम
विनाकारण फिरणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी करण्याची मोहीम जिल्ह्याभरात राबविण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरील प्रत्येक चौकात पोलिसांची चमू आरोग्य विभागाच्या पथकासह तैनात असते. यावेळी विनाकारण फिरणारा आढळून आल्यास त्याला थांबवून त्याची ऑन द स्पॉट तपासणी करण्यात येते. आतापर्यंत १७० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बॉक्स
कोरोनाचे एकूण रुग्ण :
एकूण कोरोनामुक्त
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी : ३२३८
पॉझिटिव्ह : १७०