२० टक्के अनुदानावर आलेल्या शाळांचे वेतन अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:47+5:302021-04-13T04:26:47+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील नव्याने २० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या उच्च माध्यमिक शाळेचे वेतन देयक वेतन पथक कार्यालयाने त्रुटी ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील नव्याने २० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या उच्च माध्यमिक शाळेचे वेतन देयक वेतन पथक कार्यालयाने त्रुटी काढून प्रलंबित ठेवले आहे. त्रुटी पूर्ततेसाठी व हक्काचा पगार त्वरित खात्यात जमा करावा यासाठी शिक्षक समन्वय संघ आणि चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनने वेतन पथक कार्यालयात धाव घेत निवेदन दिले. दरम्यान, त्वरित वेतन अदा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.
शाळांच्या त्रुटी पूर्तता करताना आणि निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, कार्याध्यक्ष रमेश पायपरे, सचिव राजू साखरकर, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक तथा कमवीचे जिल्हाध्यक्ष अजय अलगमकर, सचिन भोपये, सुग्रीव गोतावळे, विजय धकाते, प्रवीण रामटेके, सचिन हर्षे, पोटदुखे, अंड्ररस्कर, शैलेश झाडे, तसेच २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी पगार खात्यात जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान, वेतन पथकाचे अधीक्षक बोदाडकर रजेवर असल्यामुळे प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासह, अधीक्षक बोदाडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत वेतन त्वरित जमा करण्याची मागणी केली.