शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:00+5:302021-01-08T05:33:00+5:30

शिक्षक परिषदेची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर : शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन महाराष्ट्र ...

Pay teachers in a nationalized bank | शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत करा

शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत करा

Next

शिक्षक परिषदेची मागणी : गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर : शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने भद्रावती येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी सेवापुस्तक अद्ययावत करण्यासाठी कॅम्प लावणे, प्राथमिक शिक्षकांना गोपनीय अहवाल देण्यात यावा, मासिक वेतनातून होणाऱ्या विविध कपाती तत्काळ जमा करण्यात याव्यात, निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात यावे, मासिक पगार बिल पीडीएफ केंद्राच्या व्हाॅट्सॲप समूहावर टाकावा, प्राथमिक शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून करण्यात यावे, डीसीपीएस योजनेतून वगळलेल्या प्राथमिक शिक्षकांची रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये वळती करावी, प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठविण्यात यावे, आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा भद्रावतीच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे, गटशिक्षणाधिकारी धनपाल फटींग, आदींसोबतही चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा कोअर कमिटी सदस्य विलास बोबडे, विनोद बाळेकर, कार्यवाह छत्रपती राऊत, कार्याध्यक्ष, विलास खाडे, शंकर निखाडे, विलास मेश्राम, मनोज चौखे, संदीप गराटे, सचिन जांभुळे, सुभाष मसराम, आदी उपस्थित होते.

Web Title: Pay teachers in a nationalized bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.