विविध मागण्यांसाठी सिंदेवाहीत शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:48 PM2018-06-10T23:48:08+5:302018-06-10T23:48:19+5:30

येथील शेतकरी-शेतमजुर महासंघातर्फे रविवारी सिंदेवाही बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सकाळपासूनच शहरातील संपुर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शेतकरी गुरुदेव सेवा मंडळ मैदानातून आझाद चौक मार्गे आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयावर धडकले.

The peasantry's front for different demands | विविध मागण्यांसाठी सिंदेवाहीत शेतकऱ्यांचा मोर्चा

विविध मागण्यांसाठी सिंदेवाहीत शेतकऱ्यांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देशंभर टक्के बंद : शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : येथील शेतकरी-शेतमजुर महासंघातर्फे रविवारी सिंदेवाही बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सकाळपासूनच शहरातील संपुर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शेतकरी गुरुदेव सेवा मंडळ मैदानातून आझाद चौक मार्गे आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयावर धडकले.
या मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल यांनी केले. सिंदेवाहीचे प्रभारी तहसीलदार व्ही. आर. सलामे यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. मागण्यांमध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावे, शेतमालाला योग्य भाव द्याव, शेतकºयाला पेंशन लागू करावी, शेतकºयांच्या मुलाला शिक्षण व औषधोपचार मोफत द्यावे, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशा विविध वीस मागण्यांचा समावेश आहे.
या मोर्चासाठी सिंदेवाही शहरात सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. पानटपरी चालकांनी आपली दुकाने स्वयंफूर्तीने बंद ठेवले होते. व्यापाºयांनीही मोर्चाला पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Web Title: The peasantry's front for different demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.