तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:26 AM2018-01-24T01:26:36+5:302018-01-24T01:28:28+5:30
येथील शेतकरी, शेतमजूर महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : येथील शेतकरी, शेतमजूर महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली.
गुरुदेव सेवा मंडळ सभागृहापासून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील उत्पन्न अत्यल्प व नाहीच्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पुढील हंगामाचे उत्पन्न हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना मदत म्हणून हेक्टरी ५० हजार रूपयाचे अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार स्वप्नील रावळे यांना देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व शेतकरी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे व कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल यांनी केले. नामदेव ठाकरे, अशोक तुम्मे, लोकमित्र गेडाम, उद्धव लोखंडे, वासुदेव बोरकर, सुदाम खोब्रागडे, मधुकर बोरकर, माधव आदे, प्रकाश सहारे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता.